फलटण प्रतिनिधी- माऊली फाऊंडेशन मुंबई यांच्या वसुंधरा संवर्धन मोहिमे अंतर्गत माऊली फाउंडेशन मुंबई आणि फलटण बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विमानतळावर पर्यावरण एक रोपांचे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फलटणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मे. चतुर साहेब व सर्व न्यायाधीश साहेब, विधीज्ञ, पक्षकार यांच्या शुभहस्ते हे वृक्षारोपण फलटण येथील विमानतळावर करण्यात आले.
फलटण बार असोसिएशनच्या माध्यमातून वृक्षारोपण केलेल्या सर्व रोपांचे संवर्धन आणि संगोपनाची जबाबदारी घेतली जाणार आहे. अँड. झोरे सर यांनी झाडांना पाणी नियमित मिळावे म्हणून ठिंबक सिंचनाची सोय करून देण्याची जबाबदारी घेतली आहे. या प्रसंगी बार असोशिएशनचे अध्यक्ष बापूराव सरक, वकील संघाचे इतर पदाधिकारी अँड. डी. जी. शिंदे , अँड.शेडगे, अँड मेघा अहिवळे, अँड.साठे, माऊली फाऊंडेशनचे सदस्य अँड. राहुल कर्णे, अँड. नामदेव शिंदे, अँड धीरज टाळकुटे, अँड राहुल सतुटे, अँड. दत्तात्रय कांबळे, अँड.रोहिणी भंडळकर, अँड. राहुल बोराटे, अँड.रामचंद्र घोरपडे, कांबळे, तात्या गायकवाड, निता दोशी, संगिनी फोरम खजिनदार मनिषा घडिया आणि जेष्ठ पक्षकार केरु चिमाजी शिंदे, गुलाब नारायण शिंदे इतर सेवेकरी हजर होते.
Back to top button
कॉपी करू नका.