ताज्या घडामोडी

खंडकरी शेतकऱ्यांच्या मदतीला पुन्हा एकदा श्रीमंत रामराजे आले धावून

फलटण प्रतिनिधी- : राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांसाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर हे पुन्हा एकदा धावून आल्याचे दिसून आले आहे. ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन एक एकर किंवा त्या पेक्षा कमी होती अश्या खंडकरी शेतकऱ्यांना त्यांचे जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात प्रथम फलटण तालुक्यामध्ये वाटप करण्यात येत आहे; अशी माहिती खंडकरी शेतकरी संघटनांचे अध्यक्ष लक्ष्मणराव निंबाळकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना निंबाळकर म्हणाले की; राज्यामध्ये असणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम पहिल्यापासूनच श्रीमंत रामराजे यांनी केलेले आहे. राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेतृत्व हे श्रीमंत रामराजे यांनी केल्यामुळे राज्यातील सर्व खंडकरी शेतकऱ्यांना गत काही वर्षांपूर्वी जमिनी पुन्हा मिळालेल्या होत्या. खंडकरी शेतकऱ्यांना पुन्हा जमिनी मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे हे होते. यामुळे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना पुन्हा जमिनी मिळाल्या आहेत.

यासोबतच एक एकराच्या आतमधील शेतकऱ्यांना जमिनी वाटपाचे काम राहिलेले होते. ते वाटप आता करण्यात आलेले आहे यामध्ये सुद्धा विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे योगदान मोलाचे आहे. फलटण तालुक्यामध्ये एक एकराच्या आतील एकूण 129 खंडकरी शेतकरी होते. त्यामधील 95 शेतकऱ्यांना पुन्हा जमीन देण्याचे आदेश दि. 06 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेले आहेत. उर्वरित खंडकरी शेतकऱ्यांची यादी सुद्धा लवकरच प्रसिद्ध होणार आहे; अशी माहिती यावेळी निंबाळकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना निंबाळकर म्हणाले की; फलटण तालुक्यामधील सरडे, सोनगाव, सांगवी, जिंती, फडतरवाडी, सुरवडी, निंभोरे, काळज, तडवळे, रावडी खु.||, रावडी बु.||, मुरूम, खामगाव या गावामध्ये एक एकराच्या आतील शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. होळ व पिंपळवाडी गावामधील खंडकरी शेतकऱ्यांचे वाटप नजीकच्या काळात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, फलटणचे कार्यक्षम प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.