सांगली (क्री. प्र.) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने होणारी कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, सांगली जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. यामध्ये महिला व पुरुष, किशोर व किशोरी गटाचे मिळून ४० संघ सहभागी होणार आहेत.
कुपवाड येथील अकूज ड्रीमलेंड (ता. मिरज जि. सांगली) येथे होणार्या स्पर्धेचे उद्घाटन ५ रोजी सायंकाळी ७ वाजता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे, कामगार मंत्री व पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे, स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेमध्ये खेळाडू, संघव्यवस्थापक, पंच, संघटना प्रतिनिधी, शासकीय अधिकारी असे एकूण ७८० जण सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने मान्यता दिलेल्या महिलांचे-पुरुषांचे व किशोर-किशोरींचे ४० संघ सहभागी होतील अशी माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव व स्पर्धा आयोजन सचिव गोविंद शर्मा, किरण बोरवडेकर (जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली, माणिक पाटील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग व प्रशांत इनामदार यांनी दिली.
Back to top button
कॉपी करू नका.