ताज्या घडामोडी
लोणंद नगरपंचायतीच्या चतुर्थ वार्षिक श्रेणीमध्ये असंख्य चुका फेरसर्वे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश – ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील
लोणंद बस स्थानकासाठी मुख्यमंत्र्यांनी पाच कोटी रु.निधीस दिली प्रशासकीय मान्यता

लोणंद प्रतिनिधी- (बाळ लोणंदकर) लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील लोणंद नगरपंचायतीच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीस तात्काळ स्थगिती द्यावी, तसेच एजेन्सीकडून असंख्य चुका झाले कारणाने फेर सर्वे करणेत यावा अशी मागणी समाज कल्याण जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे माजी सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील यांनी मंत्रालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी आमदार जयकुमार गोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, युवा नेते
श्री.विराज शिंदे, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री.राहुल घाडगे, नगरसेवक श्री. प्रवीण व्हावळ, सौ.राजश्री शेळके-पाटील, श्री. संदीप शेळके-पाटील, श्री. साजिद बागवान, श्री.हर्षवर्धन शेळके-पाटील, श्री.निलेश शेळके-पाटील, श्री.दिपक डोणीकर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती दिलेल्या निवेदनामध्ये म्हंटले आहे की, लोणंद नगरपंचायतीने केलेल्या अवाजवी करवाडीचा विषय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला असता तात्काळ मुख्यमंत्री महोदयानी
कारवाढीस तात्काळ स्थगिती व फेर सर्वे करणेबाबतचे आदेश मा.प्रधान सचिव सो. यांना दिले आहेत.
त्यामुळे लोणंद नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या व्यापारी व रहिवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असल्याचे शेळके पाटील यांनी सांगितले आहे तसेच यावेळी लोणंद एसटी स्टँडच्या पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्री महोदय यांना निधीची मागणी केली यावेळी तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी 5.00 कोटी रुपये निधीला तात्काळ प्रशासकीय मंजुरी दिली आहे त्यामुळे लोणंद शहरातील एसटी स्टँड चा प्रश्न मार्गी लागला असल्याचेही शेवटी शेळके पाटील यांनी सांगितले आहे याबद्दल आनंदराव शेळके -पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. जयकुमार गोरे, सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे आभार मानले आहेत.