फलटण प्रतिनिधी फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय, कनिष्ठ विभागामार्फत ऑलिंपिकवीर या विषयावर भित्ती पत्रकाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या हस्ते समारंभ पूर्वक व फीत कापून करण्यात आले.
नुकतीच पॅरिस या ठिकाणी ऑलिंपिक स्पर्धेची सांगता झाली. विनेश फोगाट यांच्यामुळे ही स्पर्धा भारतीयांच्या मनात कायम लक्षात राहिली आहे.
खेळाडू घेत असलेल्या कठोर मेहनतीची जाणीव, यश- अपयश पचवण्याची क्षमता व जाणीव जागृत होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मध्ये त्या खेळाबद्दल माहिती व आवड निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी.एच. कदम, उपप्राचार्य प्रा.डी.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिंपिकवीर या भित्तीपत्रकाचे आयोजन करण्यात आले, त्याला इयत्ता ११वी व १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय तसेच विदेशातील ऑलिम्पिकवीर यांच्यावर माहिती पर लेख लिहिले तसेच कनिष्ठ महाविद्यातील प्रा. रणधीर मोरे, प्रा.सौ. निलम देशमुख, प्रा.मच्छिंद्र वाघमोडे, प्रा. सौ.गौरी जाधव यांनीही लेख लिहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी नियामक मंडळ सदस्य मा. डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, प्राचार्य डॉ. पी.एच. कदम , उपप्राचार्य प्रा. डी. एम. देशमुख,
प्रा. विक्रम आपटे, भित्तीपत्रक समिती अध्यक्ष प्रा. रणधीर मोरे तसेच सदस्य प्रा. राजकुमार मोहिते, प्रा. विकास तरटे ,प्रा. रमेश गवळी, प्रा.मच्छिंद्र वाघमोडे, प्रा.सौ. निलम देशमुख , प्रा.सौ. ए.व्ही.शिंदे तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार इयत्ता बारावी कला शाखेतील विद्यार्थिनी कु. वैष्णवी जाधव यांनी मानले
Back to top button
कॉपी करू नका.