(फलटण/ प्रतिनिधी)- दि ३१ रोजी श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जाधववाडी , फलटण येथे विद्यार्थ्यांना आजी आजोबांचे महत्त्व समजाविण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम म्हणून साजरा करण्यात आला.
सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी-आजोबांसोबत घालवतात. खरंतर आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचं नातं फार विलक्षण असतं, खास असतं. आजी-आजोबा हे नातवंडांची पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी-आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणं आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आणि प्रेरणादायी आहे, असे सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
शाळेतील अनुभवासह आजी-आजोबांचे अनुभव, त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्याच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित करुन मुलांशी संवाद, खेळ आणि गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख करण्यासाठी ‘आजी-आजोबा’ दिवस शाळेत साजरा करणं संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचं आहे.
मुलांना शाळेबरोबरच आजी-आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी हा दिवस साजरा होणं आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघ संचलित ओंकार वृद्धाश्रम कुरवली येथील आजी-आजोबांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी चौदा ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संदेश फाळके, गुवाहाटी येथे पीएचडी प्राप्त केलेले , फलटण एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमणलाल दोशी, सदस्य चंद्रकांत पाटील राजगुडा सर, आश्रम शाळेच्या अध्यक्षा सेवानिवृत्त प्राध्यापिका सौ दाणी मॅडम, मधुजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले, मीनल दीक्षित, गांधी लॅबचे चेअरमन, प्रवीण शहा, विपुल शहा, डॉ.निलीमा दाते, डॉ.संदेश फाळके, रामचंद्र आप्पासो निंबाळकर या मान्यवरांचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत केले, विद्यार्थ्यांनी त्यांचे पाय धुतले व त्यांना ओवाळले त्यामधून आपली भारतीय संस्कृती जपली.
कार्यक्रमा दरम्यान इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी दिव्या शहा हिने भरतनाट्यम सादर केले तर, सिद्धी इतराज, जिजाई निकम, सिद्धी निकम यांनी कवितेच्या माध्यमातून आजी-आजोबांच्या महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य सौ. संध्याकाळी मॅडम यांनी केले,तर सूत्रसंचालन सतीश पवार सर यांनी केले. स्वाती शिंदे व महेश निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
Back to top button
कॉपी करू नका.