ताज्या घडामोडी
चंदूकाका सराफ सुवर्णपेढीच्या वतीने फलटणमध्ये पायल महोत्सवाचे आयोजन- श्रेनिक दानोळे
पायल महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांना देण्यात येणार आकर्षक सूट - दत्ता पवार

फलटण प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्ण पेढी व ज्वेलरी क्षेत्रात आपली ओळख शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नाविन्यता व चोख व्यवहार अशी आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली चंदुकाका सराफ सुवर्णपेढी यांच्या फलटण येथील शाखेच्या माध्यमातून २६ डिसेंबर – २०२४ ते २४ जानेवारी- २०२५ पर्यंत पायल महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती फलटण शाखेचे शाखाप्रमुख श्रेणिक दानोळे व दत्ता पवार यांनी दिली.
नुकतेच काल पायल महोत्सवाचे उद्घाटन फलटण नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. वैशाली चोरमले, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील अभिजीत कदम, फलटण वकीलबार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बापूराव सरक, महात्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, सगुनामाता कन्स्ट्रक्शन चे संचालक दिलीप शिंदे आम्रपाली बचत गट व ब्युटी असोसिएशनच्या अध्यक्ष सौ. वनिता चव्हाण इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेड सातारा जिल्हा अध्यक्ष सौ मोनाली वरे, सौ. काजल माने, सौ. भरते मॅडम, सौ. गाडगे मॅडम, ॲड.
अक्षय सोनवलकर, पोलीस हवालदार नितीन सजगणे इ. मान्यवर याप्रसंगी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्रेनिक दानोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना पुढे दत्ता पवार म्हणाले की, बारामतीचे सोने म्हणजे शुद्ध सोने ही म्हण खरी करणारी तब्बल १९८ वर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेली चंदुकाका सराफ सुवर्णपेढी असून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चंदुकाका सराफ या सुवर्ण पिढीच्या शाखा आहेत. आमच्या फलटण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पायल महोत्सवाच्या माध्यमातून महिला भगिनी व ग्राहकांसाठी अनेक ऑफर देण्यात आल्या असून विशेष करून पायल, बिछवी व जोडवी यांच्या मजुरीवर १५ टक्के सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर फार्मिंग ज्वेलरी जर का ग्राहकांनी किंवा महिलां- भगिनींनी खरेदी केली तर या ज्वेलरीवर देखील आकर्षक अशी १० टक्के सूट देण्यात आली आहे.
याप्रसंगी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले व फलटण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बापूराव सरक यांनी या महोत्सवाच्या निमित्ताने चंदुकाका सराफ अँड सन्स या सुवर्णपेढीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध महोत्सवाचे कौतुक केले व या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.
तरी फलटण शहरातील व तालुक्यातील महिला भगिनींनी या पायल महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी दत्ता पवार व शाखाप्रमुख श्रेनिक दानोळे यांनी केले आहे.