ताज्या घडामोडी

जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त १३ ऑक्टोबर मॅरेथॉनचे आयोजन -डॉ. प्रसाद जोशी

जोशी हॉस्पिटल प्रा. ली.आयोजित " *आपली फलटण मॅरेथोन २०२४* " *दिनांक १३ ऑक्टोबर २०२४.*

जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि फलटण रोबोटिक्स सेंटरच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे
जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन रविवार दि. 13 आक्टोंबर २०२४ रोजी सकाळी 6 वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जोशी हास्पिटल गेल्या ९ वर्षापासून अनोख्या व आगळ्या वेगळ्या पध्दतीने हा दिन साजरा करत आहे.

मानवी जीवन आनंदी व समाधानी असावे , त्यासाठी निरोगी मनाची आणि निरोगी मनाच्या वास्तव्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असून देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढीला समजावून घेवून त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे हे सामाजिक कर्तव्य असून जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनचा कार्यक्रम हा त्यादृष्टीने खारीचा वाटा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले.

२५ ते ७५ वर्षे वयोगटातील सर्वांना व्यायामाचे महत्त्व समजावून देणे व प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
गेल्या २४ वर्षांपासून फलटण येथे कार्यरत असताना अस्थिरोग उपचार, सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि मणक्यांवरील शस्त्रक्रिया करून अविरत उपचार देणे चालूच आहे . सदरचे पेशंट आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने सर्वांनी एकत्र येवून दि.१३ आक्टोबर २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी सार्वांना केले आहे.

या वर्षी प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई पोलिसच्या पहिल्या महिला कमिशनर, ऍडव्होकेट आणि *आयपीएस* ऑफिसर
*सौ.मीरा बोरवणकर चढ्ढा* या येणार आहेत.
त्याच बरोबर एशियन गेम्स चॅम्पियन आणि Olympic medalist
*सौ. ललिता बाबर* या सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
या वेळी महिलांचा सहभाग जास्त अपेक्षित असून महिलांचे सबलीकरण आणि सशक्तीकरण या वर सौ. मीरा बोरवणकर खास मार्गदर्शन करणार आहेत.
आकर्षक बक्षिसे आणि उत्तम नियोजन हे
आपली फलटण मॅरॅथॉन चे आत्ता पर्यंत वैशिष्ट्य ठरले आहे.
ह्या मॅरॅथॉन साठीचे रजिस्ट्रेशन
१५ ऑगस्ट २०२४ रोजी OPEN होणार आहे असे डॉ प्रसाद जोशी यांनी सांगितले.
हे रजिस्ट्रेशन ‘ ONLINE ‘ पद्धतीने
*www.joshihospitalpvtltd.com*
या वेबसाईट वर करता येईल .
१५ ऑगस्ट २०२४ रोजी मॅरॅथॉन चे सर्व details आपल्याला कळवले जातील आणि ते आपण वरील website वर सुद्धा पाहू शकाल. अशी माहिती डॉक्टर जोशी यांनी दिली आहे.

करूयात आरोग्यदायी भविष्याची सुरुवात ‘आपली फलटण मॅरॅथॉन’ मध्ये घेऊन भाग, पळून सर्वांनी एकत्र करूयात अस्थिरोग दीन साजरा दिमाखात !
निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे आपल्याच हातात’
महिलांचा मेळावा होईल साजरा उत्तम, म्हणून पळूबाई जोरात

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.