ताज्या घडामोडी

मुख्याधिकारी यांचे मुख्यालयात न राहणे व बेजबाबदार वागण्यामुळे नागरिक हैरान – युवा नेते युवराज शिंदे

फलटण प्रतिनिधी – नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या जीवनावश्यक व दैनंदिन कामानिमित्त स्थानिक नागरिक स्वराज संस्थेशी सातत्याने संबंध येत असतो या नागरी स्थानिक स्वराज्य प्रमुख या नात्याने मुख्याधिकाऱ्याने नागरिकांच्या समस्यांचे वेळीच निराकरण करणे व नागरी प्रशासन सुव्यवस्थित राखणे आवश्यक असताना फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी मुख्यालयातच राहत नसल्यामुळे स्थानिक लोकांच्या प्रश्नांशी त्यांची नाळ जुळू शकली नाही आणि हे मुख्याधिकारी यांचे वर्तन बेजबाबदारपणाचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे युवराज शिंदे म्हणतात की मुख्याधिकाऱ्याने विनापरवानगीने मुख्यालय सोडणे गैर आहे त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याबाबत शासनाने 15 ऑक्टोबर 2015 च्या परिपत्रकानुसार स्थायी आदेश दिलेले आहेत असे असताना देखील फलटणचे मुख्याधिकारी निखिल मोरे हे शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून मुख्यालय वास्तव्य न करता जसा वेळ मिळेल तसे नगरपालिकेत येत असतात बऱ्याच वेळा असे निदर्शनास आले आहे की आठवड्यातून मुख्याधिकारी एक ते दोन दिवस आपल्या दालनात हजर असतात इतर वेळी ते कधीच मुख्यालयात आढळून येत नाही त्यांचा मनमानी कारभार सुरू असून त्यांच्यावर कोणाचा अंकुश राहिला नाही. नगर परिषदेचे मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्यामुळे खालील स्टाफ वर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही त्यामुळे कामाचा निपटारा होत नसल्यामुळे अक्षरशा सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असल्याचे सांगून पुढे युवराज शिंदे म्हणतात की, याबाबतीत साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील हे लक्ष घालणार काय व जे मुख्याधिकारी मुख्यालयी वास्तव्य करीत नाही. त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करणार का हे पाहणे आता औसुक्याचे ठरणार आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.