ताज्या घडामोडी

लायन्स क्लब,फलटण व लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम यांच्या वतीने दिव्यांग शाळेत किराणा वाटप

फलटण प्रतिनिधी- लायन्स क्लब फलटण व लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा शिक्षण संस्था संचलित निवासी मूकबधिर वसतिगृहाला एक महिन्याचे किराणा वाटप करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, साखर, तेल डबा, शेंगदाणे, साबण, कोलगेट ब्रश व  सर्व प्रकारची कडधान्य इत्यादी वस्तूंचा समावेश होता.

याप्रसंगी लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष लायन जगदीश करवा, लायन्स क्लब फलटणचे सेक्रेटरी महेश साळुंखे, लायन्स नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन लायन मंगेशभाई दोशी, हंगर डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन सौ. निलम लोंढे- पाटील, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा ला. सौ. संध्या फाळके, ला.सौ. मंगल घाडगे ला. सौ. वैशाली चोरमले, मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व वैशाली शिंदे, उपशिक्षिका सौ. हेमा गोडसे, सौ. विजया मठपती, उदय निकम, चैतन्य खरात,  निर्मला चोरमले इत्यादी मान्यंवर या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना लायन मंगेश दोशी म्हणाले की, लायन्स क्लब फलटण च माध्यमातून यंदा दिव्यांग मुलांच्या वस्तीगृहातील 40 मुलांसाठी एक महिना पुरेल एवढा किराणा माल यावेळी लायन जगदीश करवा यांनी दिला असून यंदाच्या वर्षी लायन्स क्लब फलटणच्या माध्यमातून लायन जगदीश करवा यांनी अनेक ऍक्टिव्हिटी केल्या असून फलटण लायन्स क्लबचे नाव विभागामध्ये अग्रेसर ठेवले आहे. लायन जगदीश करवा यांच्या नेतृत्वाखाली फलटण लायन्स क्लब भविष्यातही अशीच समाजोपयोगी कामे करून समाजातील गरजू, वंचित, उपेक्षित दिव्यांग घटकाला मदत करीत राहील अशी अपेक्षाही शेवटी लायन मंगेशभाई दोशी यांनी व्यक्त केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.