ताज्या घडामोडी

जैन सोशल ग्रुप संगिनी करून यांच्यावतीने योग-दिनाचे आयोजन

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – जेन सोशल ग्रुप व संगिनी फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल गुणवरे व फलटण नगर परिषद फलटण येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगीयावेळी नगर परिषद मुख्याधिकारी निखिल मोरे, उपमुख्याधिकारी पाटील साहेब, सरस्वती शिक्षण संस्था गुणवरेचे सचिव विशाल पवार, MARC योगा व मेडिटेशन कमिटीचे कन्वेअर सविता दोशी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी, जैन सोशल ग्रुप अध्यक्ष श्रीपाल जैन

सचिव निना कोठारी, खजिनदार राजेश शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, इव्हेंट चेअरपर्सन तुषार शहा, संचालक डॉ.मिलींद दोशी, प्रितम गांधी, मनिषा घडिया, सदस्य रोहीत गांधी, सौरभ दोशी, संगिनी फोरमच्या अध्यक्षा मनिषा व्होरा, सचिव वृषाली गांधी, खजिनदार विनयश्री दोशी, सदस्या सौ. सुरेखा उपाध्ये युवा फोरम अध्यक्ष पुनित दोशी, सचिव सिध्देश शहा, खजिनदार मिहीर गांधी, सहसचिव क्षितीज घडिया, संचालक अक्षय दोशी, ईव्हेट चेअर पर्सन यशराज दोशी, सदस्य पुर्वल शहा व तीन हि ग्रुपचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.


योगा प्रशिक्षक सौ. वृषाली गांधी यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून घेऊन त्यांना आपल्या जीवनातील योगशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतले.
कु.श्रध्दा शिंदे, प्रियंका शिंदे, परिणीती कदम, आर्या वादे या विद्यार्थिनींनी योगा डेमो करुन दाखविला. प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही उत्कृष्ट योगा डेमो दिला. ब्रिलियंट अकॅडमी विद्यार्थ्यांनी योगा कार्यक्रमात सहभाग घेतला. जैन सोशल ग्रुप अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविकात योगाचे महत्व विषद करुन जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलच्या योगा मधे विशेष प्राविण्य मिळवलेल्या तीन विद्यार्थ्यांचा योगा मॅट भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सुत्रसंचलन दिप्ती राजवैद्य यांनी केले. आभार प्रदर्शन जैन सोशल ग्रुप सचिव निना कोठारी यांनी केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.